सूक्ष्म कणांची बुद्धिमत्ता हिच विश्वाची बुद्धिमत्ता
जे कृष्णमुर्ती हे स्वतः आत्मा, परमात्मा, ईश्वर किंवा इतर कोणत्याही दैवी शक्ती चे अस्तित्व नाकारीत असत.
ते नेहमी या विश्वाचा जो मुळ आधार आहे ते Intelligence, Compassion, Love आहे असे मानत असत आणि तेच त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून सतत सांगितले होते.
मानवी मन हे श्रद्धाळू आहे त्यामुळे त्याने बुद्धाचा *शून्यवाद म्हणजे काहीच नाही* याला सुद्धा काहीतरी दैवी अवस्था असावी असे मानले होते तसेच कृष्णमुर्ती यांच्या Intelligence या शब्दाला सुद्धा ती काही तरी दैवी शक्ती असावी असे समजून चालत आले आहे.
जीवशास्त्र संशोधक मिचेल लेविन यांनी संशोधन करून सिद्ध केले आहे की, सर्व मोठ्या वस्तूंचे अस्तित्व हे त्यांच्या सूक्ष्म कणांमध्ये असते. सूक्ष्म कणांना मेंदू आणि मज्जा संस्था नसते तरीही ते कण एकमेकांशी संबंध जुळविताना जी बुद्धिमत्ता वापरतात तेच या विश्वाचे Intelligence आहे.
हे विश्व अनादी काळापासून अस्तित्वात आहे आणि या प्रचंड कालावधी मध्ये या सूक्ष्म कणांना कोणाशी संबंध जुळवायचे आणि कोणाशी संबंध नाकारायचे याचे सामूहिक ज्ञान झालेले आहे. संबंध जुळविताना त्यामध्ये करुणा असेल तर ते संबंध चांगले होतात आणि दीर्घकाळ टिकून राहतात. या विरुद्ध ज्या संबंधात स्वार्थ असतो, हिंसा असते ते संबंध चांगले नसतात आणि फार काळ टिकून रहात नाही.
करुणामय संबंधातून जे निर्माण होत असते त्यामध्ये प्रेम असते आणि स्वार्थी संबंधातून जे निर्माण होत असते त्यामध्ये द्वेष आणि हिंसा होत असते.
जे सूक्ष्म कणांमध्ये आहे तेच या अजस्त्र विश्वात आहे.
Michael Levin,
Collective intelligence of cells
https://youtu.be/c8iFtaltX-s?si=vh7S2hTtvm3fkf2_
Comments
Post a Comment