Posts

Showing posts from January, 2022

चार अवस्थांचे गौड बंगाल

 पारंपारिक शास्त्रा मध्ये जाणीव आणि तिच्या चार अवस्था मानल्या गेल्या आहेत.  सत्य अवस्था हि या चार अवस्थांच्या पलीकडील अवस्था समजली जाते. ज्याला सत्याचा साक्षात्कार करावयाचा आहे त्याने या चार अवस्था पार करायच्या असतात असे पारंपरिक शास्त्र सांगते. तुर्या, सुशुप्ती, स्वप्न, जागृती या त्या वेगवेगळ्या अवस्था परंपरांनी मानलेल्या आहेत. त्या खऱ्या आहेत काय?  आपला मी हा एक विचार आहे आणि त्याच्या मर्यादित अनुभवा मुळे तो स्वतः मर्यादित राहतो हे सर्वमान्य तथ्य आहे. जो मी स्वतः मर्यादित असतो तो अमर्यादित तत्वाला जानू शकत नाही हे सुद्धा सर्वमान्य तत्व आहे. असीमित सत्य आकलन होण्यासाठी आपण मी पणाच्या सीमित दृष्टी ने पाहू शकत नाही. आपल्या मी याचा सीमित दृष्टिकोन नाहीसा झाला तर आपण असिमीत अशा सत्य अवस्थेत होतो याचे आकलन होते.  चार अवस्थांचे सत्य समजण्या साठी आपण दिवस आणि रात्र यांचे सत्य पाहूया. ते दोन वेगवेगळे आहेत की एक आहे की केवळ भास आहेत ते पाहूया. सूर्य उगवला की दिवस आणि सूर्यास्त झाला की रात्र सुरू होते. म्हणजे दिवस आणि रात्र हे सूर्याशी संबंधित आहेत. महाभारतातील जयद्रथ आणि अर्...

Understanding Self from teachings of J Krishnamurti

Jidu Krishnmurti had explained about Self through his writings and lectures and advised interested truth seekers to realise self not through past religious dogmas and rituals but through our daily experiences. In our daily experiences there is an experiencer and the things he experiences. In all our experiences observer and the observed are always present.  Krishnmurti says that, "observer is the observed." If one understands how the observer is observed, then through that realisation he will surely understand the real nature of self.  We all understand our life through a series of experiences. So to realise the self, the observer, we must understand each and every stage of our experience, the observed. In any life experience, first our sense organs capture images of the experience, they forward those images to the brain, and the brain stores all images from sense organs into the memory. To make an announcement about the experience, there arises a response from memory. The r...

नातेसंबंध

समाजाने अगोदर नातेसंबंध म्हणजे काय हे सांगून ठेवलेले असते. ती सामाजिक धारणा ग्राह्य समजून आपला मी ती स्वतःची धारणा बनवीत असतो. आपली जी धारणा असते तो आपला अनुभव होत असतो. धारणा आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये तफावत दिसली की त्या नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होत राहतो. हे सर्वत्र सारखेच असते. म्हणून नातेसंबंध म्हणजे काय हे प्रत्येकाने गांभीर्याने प्रत्यक्ष तपासायला हवे.  आपली माहिती, ज्ञान, अनुभव हे सर्व पूर्व स्मृतींवर आधारित असतात. पूर्व स्मृती म्हणजे भूतकाळ आणि भूतकाळ म्हणजे होवून गेलेला क्षण, तो नेहमी मृत असतो. या मृत झालेल्या भूतकाळातील धारणा आणि संकल्पना यापासून आपण आपल्या जीवनातील दैनंदिन वर्तमानातील जिवंत घटनांना सामोरे जातो हीच सर्वात मोठी चूक आपण सर्वजण करीत असतो. जे वर्तमानात घडत असते त्याचा आपण नेहमी भुतकाळाशी संबंध जोडत असतो जे प्रत्यक्षात तसे नसते. वर्तमान हा कधीच भुतकाळाशी संबंधित नसतो, तो नेहमी नित्यनूतन असतो. आपल्या नात्यांचे सर्व संबंध (attachments) कल्पना या सर्व भूतकालीन आहेत, मृत आहेत. जोपर्यंत हे मृत संबंध आपण संपवित नाही तोपर्यंत आपणास खरे जिवंत संबंध कळणार नाहीत....