स्वार्थ आणि अज्ञान हे एकच आहे
स्वार्थ म्हणजे स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी करणे. मी आणि माझे हितसंबंध यांची जपणूक करणे म्हणजेच स्वार्थ होय. मानवाच्या गरजेपेक्षा जास्त संसाधने पृथ्वीवर उपलब्ध असताना मानव प्राणी अती स्वार्थी का बनला गेला असेल? सजीवांची उत्क्रांती हि एक पेशिय जीव ते अनेक पेशीय जीव अशी होत गेली आहे. ज्या पेशीमध्ये विचार करणारे किंवा निर्णय घेणारे मेंदू किंवा मज्जासंस्था सारखे अवयव नाहीत त्या पेशी सुद्धा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी इतर पेशिंबरोबर सहयोग करीत असतात. ‘स्वतः इतरांशी सहकार्य करीत जगणे आणि स्वतःचा विस्तार करणे’ या उद्देशानेच निसर्गात वैविध्य निर्मिती शक्य झाली आहे. अन्न सोडून इतर कारणासाठी सजीव स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतर सजीवांची हत्या करत नाहीत. स्वतः बरोबर इतरांनी सुद्धा जगावे हा सृष्टी नियम सर्व सजीवांच्या ठायी दिसत असतो. नवीन संशोधनानुसार मनुष्य प्राणी सुद्धा आदिम काळापासून ते अलीकडच्या १० हजार वर्षा पर्यंत इतर मनुष्याची विनाकारण हत्या करीत नव्हता. (The Dawn of everything - new human history). पशु पालन आणि शेतीचा शोध लावल्या नंतर मालमत्ता...