Posts

Showing posts from December, 2021

शांति

Image
एखादे ठिकाणी गेलो की मनाला काही काळ शांत वाटते परंतु परत ते अशांत होत राहते.  शांती कोठेतरी असते काय की ती कोठेही गेलो तरी ती सदैव प्राप्त झालेली असते? मनाला शांत करण्यासाठी मनातील अनावश्यक विचार बंद करावे लागतात. मनातील अनावश्यक विचार बंद करण्यासाठी कमालीची बुद्धिमत्ता लागते.  सारासार विवेकबुद्धी ज्याच्या कडे असते तो जीवनातील जे असार आहे त्या कडे दुर्लक्ष करतो. जीवनातील अनावश्यक काय आहे हे ओळखण्यासाठी बुद्धिमत्ता लागते. ही बुद्धिमत्ता विचारातून तयार झालेली नसते तर ती विचारा पलीकडील शांत अवस्थेतून आलेली असते.  आपले विचार आणि मन हे अतिशय मर्यादित स्वरूपाचे असतात, त्यांना आदि अंत असतो तर त्यांच्या पलीकडील अवस्थेला आदि अंत नसतो आणि ती अमर्याद स्वरूपाची असते. जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवायची हे आपले मर्यादित विचार ठरवू शकत नसतात ते काम अमर्यादित अवस्थेतील विचार विहीन सहज कृतीमधून होत असते.

राम आणि मरा यांचे सत्य

  RAM म्हणजे memory, memory म्हणजे आपले सर्व ज्ञात past knowledge. स्मृती आणि त्यांचे सतत स्फुरणारे विचार म्हणजे आपले मनोविश्र्व असते. जे knowledge ज्ञात झालेले असते तेच आपले consciousness मध्ये विचार बनून येत असतात.  मृत्यू नंतरचे स्वर्ग सुख हे जिवंतपणी अनुभवता आले तर? शक्य आहे ते.  आपण आयुष्यभर स्मृती आणि विचार यांच्या माध्यमातून नातलग, मित्र, पैसा, जायदाद आदि गोळा करीत राहतो. शारीरिक मृत्यू नंतर अचानक रीत्या ते सर्व सोडून जावे लागते.  महर्षी वाल्मिकी यांचा *म - रा* हा मंत्र आपण switch म्हणून वापरला तर जिवंतपणी आवश्यक तेव्हाच attached होवू शकतो आणि इतर वेळी detached राहू शकतो.  Switch मध्ये दोन अवस्था असतात, एक ON आणि दुसरी OFF. यालाच कॉम्प्युटर मध्ये binary language म्हणतात. Binary language मध्ये Off म्हणजे शून्य आणि On म्हणजे १ असतो. Binary १० म्हणजे आपला २ नंबर असे ते coding असते. कॉम्प्युटरची Binary हीच मूलभूत भाषा आहे, इतर सर्व भाषांचे conversion करून तिला binary भाषे मध्ये programming करून convert केले जाते. जीवनावश्यक अन्न, वस्त्र, निवारा आदि बाबींसाठी ...