शांति
एखादे ठिकाणी गेलो की मनाला काही काळ शांत वाटते परंतु परत ते अशांत होत राहते.
शांती कोठेतरी असते काय की ती कोठेही गेलो तरी ती सदैव प्राप्त झालेली असते?
मनाला शांत करण्यासाठी मनातील अनावश्यक विचार बंद करावे लागतात. मनातील अनावश्यक विचार बंद करण्यासाठी कमालीची बुद्धिमत्ता लागते.
सारासार विवेकबुद्धी ज्याच्या कडे असते तो जीवनातील जे असार आहे त्या कडे दुर्लक्ष करतो. जीवनातील अनावश्यक काय आहे हे ओळखण्यासाठी बुद्धिमत्ता लागते. ही बुद्धिमत्ता विचारातून तयार झालेली नसते तर ती विचारा पलीकडील शांत अवस्थेतून आलेली असते.
आपले विचार आणि मन हे अतिशय मर्यादित स्वरूपाचे असतात, त्यांना आदि अंत असतो तर त्यांच्या पलीकडील अवस्थेला आदि अंत नसतो आणि ती अमर्याद स्वरूपाची असते. जीवनातील कोणतीही समस्या कशी सोडवायची हे आपले मर्यादित विचार ठरवू शकत नसतात ते काम अमर्यादित अवस्थेतील विचार विहीन सहज कृतीमधून होत असते.
Comments
Post a Comment