जीवनाचे सत्य
शरीराचे यंत्र हे एक वास्तव असते तसे मन हे वास्तविक नसते, ते मानसिक असते, मानसिक विचारांनी ते बनलेले असते.
पूर्वजांच्या genes मधून नवीन शरीर चालविण्यास आवश्यक ती माहिती येत असते. श्वासोच्छवास, अन्नपचन, रक्ताभिसरण इत्यादी अनेक शरीरांतर्गत बाबी माहिती नसताना सुद्धा त्यांचे कार्य हे अविश्रांत चाललेले असते ते या genes मधून आलेल्या माहिती मुळेच.
सर्व सजीव विश्व हे न बोलता सुद्धा एकमेकांशी व्यवहार करीत असतात ते सुद्धा या genes मधून आलेल्या माहिती अनुसार.
शरीराच्या बाहेरील जगाशी जीवनावश्यक व्यवहार करण्यासाठी मन आणि त्याचे विचार उपयोगी पडतात. विचार आणि मनाचे काम सुरळीत होण्यासाठी मेंदू आणि त्याच्यातील स्मृती कार्य करीत असते.
ज्यावेळी विचार नसतात त्यावेळी मन नसते आणि विचारांचा प्रतिनिधी असलेला मानसिक मी सुद्धा नसतो. कारण शरीराचे कार्य हे genes मधून आलेल्या माहिती अनुसार चालत असते. त्यासाठी विचार, मन आणि मी या मानसिक गोष्टींची आवश्यकता नसते. मानव सोडून बहुतेक सर्व सजीव सृष्टी अशा विचार रहित नैसर्गिक अवस्थेत जीवन जगत असते.
काही नैसर्गिक बदलाने आणि मनुष्याच्या काही शारीरिक बदलाने मानव प्राण्याच्या मेंदूमध्ये स्मृती साठविण्याची क्षमता वाढीस लागली, त्यामुळे त्याचे विचार वाढू लागले, त्या प्रमाणात त्याच्या मनाचा हव्यास वाढू लागला आणि त्या प्रमाणात त्याचा मानसिक मी हा सुद्धा प्रबळ होत गेला आहे.
निसर्गात आणि मानवी शरीरात जीवनावश्यक गोष्टी आणि त्याची माहिती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु मानसिक मन आणि मी याचा हव्यास अधिकाधिक वाढू लागल्याने त्या मधून अनेक जीवन अनावश्यक गोष्टी आणि संकल्पना निर्माण होऊ लागल्या आहेत.
जीवन अनावश्यक गोष्टी आणि संकल्पना मुळे पृथ्वी ग्रहावर हवा, पाणी, जमीन, आकाश अशा सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषण सुरू झाले आहे आणि त्यामुळे सजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
सूर्य मालिकेतील पृथ्वी ग्रहाच्या अचूक स्थानामुळे पृथ्वी ग्रहा वर जीवनावश्यक परिस्थिती निर्माण होत गेली आणि त्यामुळे पृथ्वी ग्रहावर जीवन विकसित होत गेले आणि त्यातून मनुष्य प्राणी निर्माण झाला आहे.
मनुष्य प्राण्याच्या अनावश्यक मानसिक हव्यासाने निर्माण झालेल्या देव, देश, धर्म, अध्यात्म, गुरू, ग्रंथ, जाती, समाज, कुटुंब आणि विवाह संस्था अशा मानसिक संकल्पना मध्ये वितुष्ट division द्वैत हे अंतर्भूत असल्यामुळे त्यामध्ये सतत संघर्ष होत असतो.
नैसर्गिक आपत्ती पेक्षा मानव समाजाचे खूप जास्त नुकसान हे मानवानेच निर्माण केलेल्या वरील मानसिक संकल्पना मुळे झालेले आहे.
माणसातील स्वार्थी ऐतखाऊ लोकांनी स्वतःच्या उपजिविकेसाठी या मानसिक संकल्पनांचा गैरवापर करण्यासाठी त्यांच्या श्रद्धा बनविल्या आहेत आणि ते त्याचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात यशस्वी झाले आहेत. बहुसंख्य अज्ञानी मानव समाज हा त्यांच्या या अपप्रचाराला बळी पडतात, त्यांचेच भक्त बनतात आणि सत्य अवस्था जाणणाऱ्या विचारवंतांची हत्या करतात. या ज्ञानी विचारवंतांच्या नावाने सुद्धा त्याच्या हत्ये नंतर अपप्रचार सुरू केला जातो. यामुळे जीवनाचे सत्य काय आहे याचा प्रचार आणि प्रसार रोखला जात असतो.
मानवी शरीराच्या उत्क्रांती आणि genes मधील माहिती मुळे मानव प्राणी खूप विकसित झालेला आहे परंतु स्वार्थी नेते आणि त्यांच्या स्वार्थी संघटना यांच्या अपप्रचार मुळे मानसिक दृष्ट्या तो अजूनही हजारो वर्षा पूर्वीच्या जुनाट परंपरांचा बळी ठरत असतो.
दुःख हे शारीरिक नसते तर ते मानसिक असते, जीवनाचे सत्य आकलन झाले तर मानसिक दुःख नाहीसे होते आणि मानव सहज सुंदर नैसर्गिक जीवन जगू शकतो.
Comments
Post a Comment