चार अवस्थांचे गौड बंगाल
पारंपारिक शास्त्रा मध्ये जाणीव आणि तिच्या चार अवस्था मानल्या गेल्या आहेत.
सत्य अवस्था हि या चार अवस्थांच्या पलीकडील अवस्था समजली जाते. ज्याला सत्याचा साक्षात्कार करावयाचा आहे त्याने या चार अवस्था पार करायच्या असतात असे पारंपरिक शास्त्र सांगते.
तुर्या, सुशुप्ती, स्वप्न, जागृती या त्या वेगवेगळ्या अवस्था परंपरांनी मानलेल्या आहेत. त्या खऱ्या आहेत काय?
आपला मी हा एक विचार आहे आणि त्याच्या मर्यादित अनुभवा मुळे तो स्वतः मर्यादित राहतो हे सर्वमान्य तथ्य आहे.
जो मी स्वतः मर्यादित असतो तो अमर्यादित तत्वाला जानू शकत नाही हे सुद्धा सर्वमान्य तत्व आहे.
असीमित सत्य आकलन होण्यासाठी आपण मी पणाच्या सीमित दृष्टी ने पाहू शकत नाही. आपल्या मी याचा सीमित दृष्टिकोन नाहीसा झाला तर आपण असिमीत अशा सत्य अवस्थेत होतो याचे आकलन होते.
चार अवस्थांचे सत्य समजण्या साठी आपण दिवस आणि रात्र यांचे सत्य पाहूया. ते दोन वेगवेगळे आहेत की एक आहे की केवळ भास आहेत ते पाहूया.
सूर्य उगवला की दिवस आणि सूर्यास्त झाला की रात्र सुरू होते. म्हणजे दिवस आणि रात्र हे सूर्याशी संबंधित आहेत.
महाभारतातील जयद्रथ आणि अर्जुन यांची कथा आठवा, श्रीकृष्णाने दिवसा सूर्याला झाकले तरी रात्र झाली अशी त्या सर्वांची समजून झाली होती.
पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये दिवस असेल की रात्र असेल? अंतराळात अशा ठिकाणी जेथे स्वतःभोवती फिरणारे ग्रह किंवा उपग्रह नाहीत तेथे दिवस रात्र असा प्रकार नसतो.
दिवस आणि रात्र हे सत्य नाही ते सूर्य, तारे आणि ग्रह यांच्या सापेक्ष आहे. सूर्य पृथ्वीच्या ज्या गोलार्धात असतो तिकडे दिवस आणि विरुद्ध गोलार्धात रात्र दिसते.
जसे दिवस आणि रात्र हे सूर्य सापेक्ष असतात प्रत्यक्षात नसतात त्याच प्रमाणे चार अवस्थांचे गौड बंगाल आहे.
मी हा एक विचार आहे, तो प्रत्यक्षात नसतो त्याचा भास होत असतो. मी याला जी जाणीव होत असते त्यालाच आपण आपली जाणीव समजत असतो.
मुळात मी हा भास आहे आणि त्यामुळे त्याला होणारी जी जाणीव असते ती सुद्धा भासमय असते.
शरीर जेव्हा पूर्ण जागे असते तेव्हा मी पनाची जाणीव तीव्र असते, त्याला जागृत अवस्था असे शास्त्रांनी नाव दिले आहे.
शरीर झोपी गेल्या नंतर स्वप्नांची कमी तीव्रतेची जाणीव होते त्याला स्वप्नवस्था असे नाव दिले गेले आहे.
शरीर गाढ झोपी गेल्या नंतर मी पूर्ण बंद होतो, (स्मृती बंद झाली की तिची प्रतिक्रिया बंद होते, द्रष्टा नसला की दृष्य सुद्धा नसते) त्याला सुशुप्ती अवस्था नाव दिले आहे आणि नंतरच्या अवस्थेला तुरिया (पहिल्या तीन पेक्षा वेगळी).
म्हणजे जसा सूर्या मुळे दिवस रात्र यांचा भास होतो तसा शारीरिक अवस्थे अनुसार जाणीव कमी जास्त होते. जी काही जाणीव असते किंवा नसते ती सुद्धा भासच असते. त्यामुळे चार अवस्था हा सुद्धा भास ठरतो.
जाणीव मुळात मी याचा भास आहे, तिच्या परत वेगवेगळ्या अवस्था करणे म्हणजे परत भासाचे अनेक भास निर्माण करणे होय. आणि त्या भासाच्या निरासाचा भास निर्माण करणे हा अधिक खोलवरचा भास आहे.
भासाच्या जेव्हढे अधिक खोलात जावू तेव्हढा भास अधिक भासमय होत जातो आणि त्यामुळे त्याचे असत्य स्वरूप लक्षात येत नाही.
यामुळे ज्यांना मी चे खरे स्वरूप कळत नाही ते अखंड भासमय जगात जगत राहतात.
मी याचे खरे स्वरूप आकलन होण्यासाठी चार अवस्थांना निराश करण्याचे काही कारण उरत नसते. त्यासाठी फक्त कृष्णमूर्ती यांनी सांगितलेला द्रष्टा आणि दृष्य एक कसे ते जाणून घेण्याचे असते.
Comments
Post a Comment