नातेसंबंध

समाजाने अगोदर नातेसंबंध म्हणजे काय हे सांगून ठेवलेले असते. ती सामाजिक धारणा ग्राह्य समजून आपला मी ती स्वतःची धारणा बनवीत असतो. आपली जी धारणा असते तो आपला अनुभव होत असतो. धारणा आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये तफावत दिसली की त्या नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होत राहतो. हे सर्वत्र सारखेच असते.

म्हणून नातेसंबंध म्हणजे काय हे प्रत्येकाने गांभीर्याने प्रत्यक्ष तपासायला हवे. 

आपली माहिती, ज्ञान, अनुभव हे सर्व पूर्व स्मृतींवर आधारित असतात. पूर्व स्मृती म्हणजे भूतकाळ आणि भूतकाळ म्हणजे होवून गेलेला क्षण, तो नेहमी मृत असतो. या मृत झालेल्या भूतकाळातील धारणा आणि संकल्पना यापासून आपण आपल्या जीवनातील दैनंदिन वर्तमानातील जिवंत घटनांना सामोरे जातो हीच सर्वात मोठी चूक आपण सर्वजण करीत असतो. जे वर्तमानात घडत असते त्याचा आपण नेहमी भुतकाळाशी संबंध जोडत असतो जे प्रत्यक्षात तसे नसते. वर्तमान हा कधीच भुतकाळाशी संबंधित नसतो, तो नेहमी नित्यनूतन असतो. आपल्या नात्यांचे सर्व संबंध (attachments) कल्पना या सर्व भूतकालीन आहेत, मृत आहेत. जोपर्यंत हे मृत संबंध आपण संपवित नाही तोपर्यंत आपणास खरे जिवंत संबंध कळणार नाहीत. 

Relationship is actually a responsibility with compassion. इतरांची ज्यांना जेथे जेथे गरज निर्माण होते तेथे तेथे त्यांची यथाशक्ती अपार करुणेने काळजी घेणे, मदत करणे म्हणजे खरे जिवंत नाते असते. आपण ज्यांना आपले समजतो ते खरेच आपले आहेत काय याची आपण खातरजमा करू शकत नाही कारण आपणास आपण स्वतः नेमके कोण आहोत हेच समजलेले नसते. मी अमका तमका आहे हे जसे आपण समजून चालतो तसेच आपल्या माणसांना आपण आपले समजून चालत असतो. जसे आपण आपणास फसवित असतो तसेच इतर सुद्धा फसवित राहतात आणि हे फसविने सर्व जगभर चालले आहे. यामुळे जगातील सर्व मानव प्राणी दुःखी आहे, जगात सर्वत्र संघर्ष आहे आणि हिंसा सुद्धा त्यामुळेच आहे. 

आपण खरे कोण आहोत हे समजून आले की आपले संकुचित विश्व समाप्त होते आणि मग असीम विश्वातील सर्वांशी आपले खरे नाते सुरू होते आणि आपण सर्वजण एकमेकांची काळजी घेवू लागतो. 

समाजा जर एखाद्याला हे कळले आणि इतरांना ते कळले नाही तरी ते असीम विश्व त्याचे असीम प्रेम त्या एखाद्याला पुरवीत राहते ज्या पुढे संकुचित मनांचे तथाकथित दिखाऊ बेगडी प्रेम कुचकामी ठरते.

https://youtu.be/NoZB6lSA_F0


Comments

Popular posts from this blog

The Manifesto of the Retired Progenitor

Cosmic Network

Self watering interconnected planters