नात्यांचे सत्य स्वरूप
नाते म्हणजे नेमके काय असते?
आपल्या जोडीदाराच्या नाते संबंधांचे उदाहरण घेऊ.
आपण आपल्या जोडीदाराला कसे ओळखतो? त्याची प्रतिमा आपल्या स्मृती मध्ये save केलेली असते. आपली प्रतिमा त्याच्या स्मृती मध्ये save केलेली असते.
समजा दोघांच्या स्मृतीत एकमेकांची प्रतिमा नसेल तर? एकमेकांना ओळखणे शक्य होईल काय?
आपण इतरांना ओळखत असताना त्यांची प्रतिमा आपल्या मेंदूच्या / स्मृतींच्या पडद्यावर तरळत असते.
म्हणजे नाते हे स्मृतीत save केलेल्या प्रतिमांचे असते. स्मृतीत save केलेली प्रतिमा हि नेहमी भूतकाळातील असते, प्रतिमा हि कधीही live असु शकत नाही. जे Live नसते ते dead असतात. म्हणजे भूतकाळातील प्रतिमा या नेहमी dead असतात. या dead प्रतिमांना thrill हवे असते म्हणून मग pleasure, entertainment आणि वेगवेगळ्या celebrations ची आवश्यकता निर्माण होत असते.
एकमेकांच्या भूतकाळातील प्रतिमा बरोबर त्याच्या कडू गोड आठवणी सुद्धा जोडलेल्या असतात. या आठवणी सुद्धा dead memory असते. प्रतिमा आणि इतर आठवणी दोन्ही सुद्धा dead memories असतात.
त्यांना पाहणारा मी खरा कोण असतो?
आपण आपली स्वतःची सुद्धा प्रतिमा आपल्या स्मृती मध्ये निर्माण केलेली असते. हि मानसिक प्रतिमा म्हणजे आपला मानसिक मी असतो. हा मानसिक मी स्मृती मधील इतरांच्या मानसिक प्रतिमा अनुभव करत, मानसिक जीवन जगत असतो.
आपण या मानसिक प्रतिमा मुळे प्रत्यक्ष जीवन जगू शकत नाही.
माझ्याकडे दररोज नवीन पाहुणे येतात, त्यांच्या तात्पुरत्या कामापुरत्या प्रतिमा तयार होतात, guest गेले की त्या प्रतिमा पुसल्या जातात. कोणत्याही पूर्व प्रतिमा शिवाय मी नवीन पाहुण्यांना प्रेमाने सामोरे जातो, त्यांचे अगत्यपुर्वक आदरातिथ्य करतो, सर्वजण एकमेकांशी सहकार्याने आणि सौहार्द पूर्वक व्यवहार करतात.
पूर्व प्रतिमा शिवाय जे तत्क्षणी व्यवहार होतात ते प्रत्यक्षातील खरे व्यवहार असतात या उलट पूर्व प्रतिमा आठवून केलेल्या व्यवहार मध्ये काही तरी स्वार्थ असतो, काहीशी तडजोड असते किंवा पूर्व संस्कार आणि संस्कृतीचे मेलेले ओझे असते.
नाती = प्रतिमा = भूतकाळ = dead श्रद्धा
प्रेम = प्रतिमा रहित नित्य नूतन Live व्यवहार = करुणा = विवेक
Comments
Post a Comment